आपणा सर्वांच्या मागणीनुसार
Saral या महाराष्ट्र शासनाच्या database ला शिक्षक माहिती कशी भरावी यासाठी आपणासमोर कृती तक्ता देत आहे. या पोर्टल वर माहिती भरताना आपणास खालील प्रमाणे कृती करावयाची आहे.
1.
edustaff.maharashtra.gov.in/users/login या वेब वर login करा.
२. Teacher Map करणे.
३. Map from other school ( शिक्षक नाव दुसऱ्या शाळेतून घेणे.)
४. Data Updated by headmaster after mapping
५. Teaching Details
हि सर्व माहिती कशी भरावी यासाठी खालील प्रमाणे कृती करावी.
१. आपल्या वेब ब्राउजर मध्ये
edustaff.maharashtra.gov.in किंवा
education.maharshtra.gov.in हि वेब अड्रेस टाका. त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपेन होईल यामध्ये login करा.
२. login झाल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपेन होईल त्यामध्ये प्रथम Teaching Staff या tab वर माउस नेला कि drop down लिस्ट मध्ये Map with Shalarth and udise या बटनावर क्लिक करा.
३. Map with Shalarth and udise या बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला list of Teacher in shlarth व list of teacher in udise असे दोन कोलम दिसतील सुरुवातीला list of Teacher in shlarth या मध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या शिक्षका समोरील चेक बटनावर क्लिक करा त्यानंतर list of teacher in udiseया मध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या शिक्षका समोरील चेक बटनावर क्लिक करा. आलेली माहिती तपासून पहा आणि शेवटी Map Udise and shalarth या बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने Teacher Mapping पूर्ण करा.
४.जर एखादा शिक्षक जर दुसऱ्या शाळेतून बदलून आला असेल तर किंवा त्याचे नाव Mapping मध्ये दिसत नसेल तर त्यासाठी Mapp from other school हा पर्याय वापरावा. त्यासाठी Teaching Staff या tab वर माउस नेला कि drop down लिस्ट मध्ये Mapp from other school यावर क्लिक करा.
ज्या शाळेतून शिक्षक map करायचा आहे त्या शाळेचा udise code टाका व submit बटनावर क्लिक करा त्यानंतर शाळेचे नाव आपणास दिसेल त्यामध्ये शिक्षक निवडून Map बटनावर क्लिक करा.
५. Mapping पूर्ण झाल्यावर map झालेल्या शिक्षकांची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी परत तपासून भरावयाची आहे त्यासाठी Data Updated by headmaster after mapping ह्या पर्यायावर क्लिक करा.
वरील प्रमाणे प्रथम शिक्षक निवडा त्याची माहिती भरा व save या बटनावर क्लिक करा.