Tuesday, 27 April 2021

5th scholarship gender

 पाचवी स्कॉलरशिप

विषय :- मराठी

घटक :- लिंग

  • मराठी भाषेत तीन प्रकारची लिंग आहेत 

  1. पुल्लिंग   :- एखाद्या नामावरून पुरुषजातीचा बोध झाला तर ते नाम पुल्लिंग आहे असे समजते . पुल्लिंग नामाचा उल्लेख ' तो ' या शब्दाने केला जातो.

  2. स्त्रीलिंग :- एखाद्या नामावरून स्त्री जातीचा झाला तर ते नाम स्त्रीलिंगी आहे असे समजते. स्त्रीलिंग नामाचा उल्लेख ' ती ' या शब्दाने केला जातो.

  3. नपुंसकलिंगी :- एखाद्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेंव्हा ते नाम नपुंसकलिंग आहे असे समजते. नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख ' ते ' या शब्दाने केला जातो.

5th Scholarship Noun

 पाचवी स्कॉलरशिप

विषय :- मराठी

घटक :- शब्दांच्या जाती

  1. नाम :- वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या नावास किंवा गुणधर्म दर्शविणाऱ्या शब्दाला 'नाम ' असे म्हणतात.   ( उदा. कुणाल , गाय , सीताफळ, वही, महाराष्ट्र)

  2. सर्वनाम :-  नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. ( आम्ही, मी, तुम्ही, तू, तुला, तो, ती, त्याने )इ.

  3. विशेषण :- नामाबद्द्ल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. ( गोड, कडू, हुशार, सुंदर इ.)

  4. क्रियापद :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. (बोलतो, खेळतो, नांगरतो इ .)

Sunday, 25 April 2021

5th Scholarship Tense


पाचवी स्कॉलरशिप

विषय :- मराठी

घटक :- काळ 

काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

वर्तमानकाळ :- वाक्यातील क्रियापदावरून क्रिया घडत आहे असा बोध होतो. 

भूतकाळ :- वाक्यातील क्रियापदावरून क्रिया घडून गेलेली आहे असा बोध होतो.

भविष्यकाळ :- वाक्यातील क्रियापदावरून क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो. 

या घटकावरील खालील प्रश्न सोडवा.
Saturday, 29 August 2015

etribal maharashtra आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी "सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती" साठीमहाराष्ट् शासन आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी "सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती" साठी अर्ज या वर्षा पासून आँनलाईन करायची आहे. त्या करीता
www.etribal.maharashtra.gov.inया वेबसाइटवर जाऊन अ.ज.विद्यार्थीची माहीती भरायची आहे .त्या करीता principle login वर जाऊनशाळेची profile update करुन घ्यावी .

Principal login चा युझर नेम Plयु डायसकोड (example Pl27211115301) व
Password Pass@1234 आहे . 
त्या नंतर विद्यार्थीची माहिती भरण्यासाठी ck loginचा वापर करावा . ck login चा युझर नेम Ckयुडायस कोड (exampleCk27211115301) व Password Pass@1234 आहे. Ck login वर जाऊन विद्यार्थीचि आँनलाईन माहिती जतनकरायची आहे . अर्ज अचूक भरलेले हे तपासलेकि त्याचे print काढावे व अर्ज forward करावा.

Friday, 28 August 2015

SARAL- या वेब portal वर शिक्षक माहिती भरण्यासाठी guidlines


आपणा सर्वांच्या मागणीनुसार Saral या महाराष्ट्र शासनाच्या database ला शिक्षक माहिती कशी भरावी यासाठी आपणासमोर कृती तक्ता देत आहे. या पोर्टल वर माहिती भरताना आपणास खालील प्रमाणे कृती करावयाची आहे.
1. edustaff.maharashtra.gov.in/users/login  या वेब वर login करा.
२. Teacher Map करणे.
३. Map from other school ( शिक्षक नाव दुसऱ्या शाळेतून घेणे.)
४. Data Updated by headmaster after mapping
५. Teaching Details

हि सर्व माहिती कशी भरावी यासाठी खालील प्रमाणे कृती करावी.

१. आपल्या वेब ब्राउजर मध्ये edustaff.maharashtra.gov.in किंवा education.maharshtra.gov.in हि वेब अड्रेस टाका. त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपेन होईल यामध्ये login करा.

२. login झाल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपेन होईल त्यामध्ये प्रथम Teaching Staff या tab वर माउस नेला कि drop down लिस्ट मध्ये Map with Shalarth and udise या बटनावर क्लिक करा.

३. Map with Shalarth and udise या बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला list of Teacher in shlarth व list of teacher in udise असे दोन कोलम दिसतील सुरुवातीला list of Teacher in shlarth या मध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या शिक्षका समोरील चेक बटनावर क्लिक करा त्यानंतर list of teacher in udiseया मध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या शिक्षका समोरील चेक बटनावर क्लिक करा. आलेली माहिती तपासून पहा आणि शेवटी Map Udise and shalarth या बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने Teacher Mapping पूर्ण करा.

४.जर एखादा शिक्षक जर दुसऱ्या शाळेतून बदलून आला असेल तर किंवा त्याचे नाव Mapping मध्ये दिसत नसेल तर त्यासाठी Mapp from other school हा पर्याय वापरावा. त्यासाठी Teaching Staff या tab वर माउस नेला कि drop down लिस्ट मध्ये Mapp from other school यावर क्लिक करा.
ज्या शाळेतून शिक्षक map करायचा आहे त्या शाळेचा udise code टाका व submit बटनावर क्लिक करा त्यानंतर शाळेचे नाव आपणास दिसेल त्यामध्ये शिक्षक निवडून Map बटनावर क्लिक करा.
५. Mapping पूर्ण झाल्यावर map झालेल्या शिक्षकांची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी परत तपासून भरावयाची आहे त्यासाठी Data Updated by headmaster after mapping ह्या पर्यायावर क्लिक करा.
वरील प्रमाणे प्रथम शिक्षक निवडा त्याची माहिती भरा व save या बटनावर क्लिक करा.