साबणाने शरीर स्वच्छ होते; परंतु मनामध्ये वाईट विचार असतील, खोटे बोलण्याची सवय असेल, दुसऱ्यांना फसवण्याची, लुबाडण्याची संधी आपण शोधत असू किंवा चहाडी, टवाळी आणि टिंगल करण्याची सवय असेल, त्याने कितीही साबण लावून शरीर घासून घासून स्वच्छ केले, तरी त्याचे जीवन निर्मळ होऊ शकत नाही, कारण त्याचे चित्त शुद्ध नाही आणि म्हणूनच त्याला कितीही उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला ते पटत नाहीत. गळी उतरत नाहीत. जसे वसंत ऋतू आल्यावर वृक्ष आपोआप फळांनी बहरतात, पण एखादया वृक्षाला फळेच येत नसतील, तर वसंत ऋतू येऊनही त्या वृक्षाला त्याचा उपयोग नसतो. प्राण गेलेले शरीर कोणतीही क्रिया वा व्यवहार करू शकत नाही. पाण्याशिवाय शेतामध्ये पीक येऊ शकत नाही. साबण आपले शरीर स्वच्छ करू शकतो; पण आपले जीवन निर्मळ करू शकत नाही.
Your Score:
5 th Scholarship | इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती
0 Comments