Tuesday, 27 April 2021

5th scholarship gender

 पाचवी स्कॉलरशिप

विषय :- मराठी

घटक :- लिंग

  • मराठी भाषेत तीन प्रकारची लिंग आहेत 

  1. पुल्लिंग   :- एखाद्या नामावरून पुरुषजातीचा बोध झाला तर ते नाम पुल्लिंग आहे असे समजते . पुल्लिंग नामाचा उल्लेख ' तो ' या शब्दाने केला जातो.

  2. स्त्रीलिंग :- एखाद्या नामावरून स्त्री जातीचा झाला तर ते नाम स्त्रीलिंगी आहे असे समजते. स्त्रीलिंग नामाचा उल्लेख ' ती ' या शब्दाने केला जातो.

  3. नपुंसकलिंगी :- एखाद्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेंव्हा ते नाम नपुंसकलिंग आहे असे समजते. नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख ' ते ' या शब्दाने केला जातो.

5th Scholarship Noun

 पाचवी स्कॉलरशिप

विषय :- मराठी

घटक :- शब्दांच्या जाती

  1. नाम :- वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या नावास किंवा गुणधर्म दर्शविणाऱ्या शब्दाला 'नाम ' असे म्हणतात.   ( उदा. कुणाल , गाय , सीताफळ, वही, महाराष्ट्र)

  2. सर्वनाम :-  नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. ( आम्ही, मी, तुम्ही, तू, तुला, तो, ती, त्याने )इ.

  3. विशेषण :- नामाबद्द्ल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. ( गोड, कडू, हुशार, सुंदर इ.)

  4. क्रियापद :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. (बोलतो, खेळतो, नांगरतो इ .)

Sunday, 25 April 2021

5th Scholarship Tense


पाचवी स्कॉलरशिप

विषय :- मराठी

घटक :- काळ 

काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

वर्तमानकाळ :- वाक्यातील क्रियापदावरून क्रिया घडत आहे असा बोध होतो. 

भूतकाळ :- वाक्यातील क्रियापदावरून क्रिया घडून गेलेली आहे असा बोध होतो.

भविष्यकाळ :- वाक्यातील क्रियापदावरून क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो. 

या घटकावरील खालील प्रश्न सोडवा.