New

Scholarship Exam Reasoning and inference Quiz | शिष्यवृत्ती परीक्षा तर्क संगती व अनुमान

Scholarship Exam Reasoning and inference Quiz
Scholarship Exam Reasoning and inference Quiz | शिष्यवृत्ती परीक्षा तर्क संगती व अनुमान

Q1. कुणालचे बाबा सीमाचे काका आहेत तर कुणाल सीमाचा कोण?

Q2. इंग्रजी विषयात आर्यनला रोहीतपेक्षा कमी गुण मिळाले. रोहितला उमापेक्षा जास्त गुण मिळाले. उमाला गौरी पेक्षा जास्त गुण मिळाले. तर सर्वात जास्त गुण कोणास मिळाले ?

Q3. आंब्याला वड , वडाला चिंच , चिंचेला नारळ , नारळाला पेरू म्हटले तर पारंब्या कोणाला असतात?

Q4. सुजित व ईश्वरी यांच्या वयात 5 वर्षांचे अंतर आहे जर ईश्वरीचे वय 12 वर्षे असेल सुजित ईश्वरीचा लहान भाऊ आहे तर सुजितचे वय किती ?

Q5. गव्हाला बाजरी, ज्वारीला मका, बाजरीला तांदूळ, तांदळाला नाचणी म्हटले तर भात कशाचा बनवाल?

Q6. आदित्य राधापेक्षा उंच आहे. नवीन राधापेक्षा उंच आहे. आदित्यपेक्षा नवीन ठेंगणा आहे. तर सर्वात उंच कोण ?
Q7. अजित व शेखरच्या वयाची आजची बेरीज 15 वर्षे आहे तर आणखी 3 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल ?

Q8. नीताच्या मामाच्या बहिणीचा मुलगा नीताचा कोण जर मामाला एकुलती एक बहिण असेल ?

Q9. एका बागेत सुपारीपेक्षा नारळाची झाडे जास्त आहेत नारळापेक्षा वडाची झाडे कमी आहेत वडापेक्षा सुपारीची झाडे जास्त आहेत तर सर्वात कमी झाडे कोणाची ?

Q10. समीरचे वय अमितच्या वयाच्या दुप्पट आहे जर अमितचे वय संदीपच्या निम्मे आहे तर तिघांपैकी जुळे कोण ?

Q11. दोन भावांच्या आजच्या वयात आठ वर्षांचे अंतर आहे. आणखी सात वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल ?

Q12. माझी बहिण माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी असून तिचे वय 23 वर्षे आहे तर माझे वय किती असेल ?
Q13. रवी कुणालपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्षे असल्यास कुणालचे वय किती ?

Q14. समीरचे आजचे वय 15 वर्षे आहे तर सुमितचे आजचे वय 19 वर्षे आहे तर आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षांचा फरक असेल ?

Q15. काल झालेल्या क्रिकेटच्या सामन्यात धावफलक असा होता. विराट - 90, युवराज - 110 , रैना - 60, धोनी - 80 तर सर्वात कमी धावा कोणी काढल्या ?

Q16. समीर एका मुलाकडे बोट दाखवून म्हणाला. तो माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे तर समीरचे त्या मुलाशी असलेले नाते कोणते ?

Q17. घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा एकावर एक असे किती वाजता असतात ?

Q18. स्वप्नील हा रवीच्या मुलाचा काका आहे तर स्वप्नीलचे रविशी असलेले नाते कोणते ?

Q19. कोमलचे बाबा रविचे मामा आहेत तर रवीची आई कोमलची कोण ?

Q20. 4 वर्षापूवी प्रवीणचे वय 12 वर्षे होते तर आणखी 3 वर्षांनी तिचे वय किती होईल ?

Post a Comment

1 Comments