Ticker

6/recent/ticker-posts

वाक्य व वाक्यांचे प्रकार भाग 2 (मराठी व्याकरण) | Marathi Grammar Types of Sentences

वाक्य व वाक्यांचे प्रकार

 * वाक्यामध्ये किती विधाने आहेत त्यावरून वाक्याचे खालील तीन प्रकार पडतात.

1) केवल वाक्य

2) मिश्र वाक्य 

3) संयुक्त वाक्य 

* केवल वाक्य म्हणजे काय ?

    - जेव्हा एखाद्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते; तेव्हा त्या वाक्यास केवल वाक्य असे म्हणतात.

    उदा. सुरेश खेळतो.

    वरील वाक्यात 'सुरेश ' विषयी बोलले आहे म्हणून सुरेश हे उद्देश आहे व सुरेश जी कृती करतो ती आपल्याला खेळतो या शब्दापासून समजते म्हणून खेळतो हा शब्द विधेय आहे. केवल वाक्यात एकाच विधान असते. 

* मिश्र वाक्य म्हणजे काय ?

    - जेव्हा एखादी वाक्यात दोन किंवा अधिक वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात आणि त्यातील एक वाक्य मुख्य तर दुसरे त्यावर अवलंबून असणारे गौण वाक्य असते, तेव्हा अशा वाक्यास मिश्र वाक्य म्हणतात.

    उदा. जेव्हा झाडाला पाणी घातले; तेव्हा त्याला फुले आली.

    वरील वाक्यात : झाडाला पाणी घातले - हे मुख्य वाक्य

                            रान ओले झाले - हे गौण वाक्य 

* संयुक्त वाक्य म्हणजे काय ?

    - जेव्हा दोन स्वतंत्र वाक्ये ' आणि , व , परंतु , म्हणून ' अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, तेव्हा त्यास संयुक्त वाक्य म्हणतात.

    उदा. झाडाला पाणी घातले आणि त्याला फुले आली. 

वरील वाक्यात दोन वाक्ये आणि या शब्दाने जोडलेली आहेत. हि दोन्ही वाक्ये एकमेकांवर अवलंबून नाहीत.

 


खालील वाक्यांचा प्रकार ओळखून योग्य पर्यायावर क्लिक करा.

Q1.जर मी अभ्यास केला, तर मी पास होईल.

Q2.पिक चांगले आल्यामुळे शेतकरी आनंदित झाले.

Q3. सुरेश दररोज अभ्यास करतो.

Q4. आमच्या गावात रविवारी बाजार भरतो.

Q5. बस उशिरा आल्यामुळे शाळेत जायला उशीर झाला.

Q6. मी नियमित अभ्यास करतो, म्हणून मला चांगले गुण मिळाले.

Q7. भारतात लोकसंख्या जास्त असल्यामुळे शासनावर आर्थिक भार वाढतो.

Q8. तू मुंबईला जा किंवा दिल्लीला जा.

Q9. पाऊस पडला आणि हवेत गारवा आला.

Q10. जर मला सुट्टी मिळाली तर मी गावाकडे येईल.

Q11. विद्यार्थी वर्गात आले.

Q12. वर्गात शिक्षक आले आणि मुले शांत झाली.

Q13. वेगाने गाडी चालवल्यामुळे त्याचा अपघात झाला.

Q14. ते गुलाबाचे फुल सुरेशला दे.

Q15. पाऊस पडला तेव्हा मनाचे समाधान झाले.

Your Score:

Post a Comment

1 Comments