New

मराठी व्याकरण उभयान्वयी अव्यय | Marathi Grammar Conjunction

मराठी व्याकरण उभयान्वयी अव्यय

 उभयान्वयी अव्यय

*उभयान्वयी अव्यय :-  
                        दोन किंवा अधिक वाक्ये, तसेच दोन किंवा अधिक शब्द जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात.  (लिंग, वचन, विभक्ती यांमुळे शब्दाच्या रुपात काहीच बदल होत नाही अशा शब्दांना अविकारी शब्द म्हणतात.)

        उदा. कुणाल जय एकाच वर्गात आहेत.

    वरील वाक्यात कुणाल आणि जय या दोन शब्दांना ' व ' या शब्दाने जोडले आहे. म्हणून व हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. 

        उदा . मी घरी आलो आणि पाऊस सुरु झाला.

    वरील उदाहरणात आणि या शब्दाने दोन वाक्ये जोडली आहेत त्यामुळे आणि हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे.

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा व त्यावर क्लिक करा.

Q1. माझ्या पिशवीत नेहमी कात्री आणि कंगवा असतो.

Q2. कुणालने खूप अभ्यास केला; म्हणून त्याची सैनिक स्कूलसाठी निवड झाली.

Q3. क्रिकेट स्पर्धेत अनिल किंवा अक्षय भाग घेईल.

Q4. रमेश आणि सुरेश यांची हळू चालण्याची स्पर्धा होती.

Q5. मी अंघोळीसाठी गेलो; परंतु नळाला पाणी नव्हते.

Q6. जर तू अभ्यास केला असता, तर तू नक्की पास झाला असता.

Q7. मला उशीर झाला; परंतु शाळा भरली नव्हती.

Q8. जयेश आणि सुधीर एकाच बसमध्ये प्रवास करत होते.

Q9. तुला आंबे हवे की संत्री हवी?

Q10. पप्पांनी कुणालला फिरायला नेले; शिवाय आईस्क्रीमही दिली

Your Score:

Post a Comment

8 Comments