Ticker

6/recent/ticker-posts

मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यय | Marathi Grammar kriyavisheshan

मराठी व्याकरण क्रियाविशेषण
मराठी व्याकरण क्रियाविशेषण | Marathi Grammar kriyavisheshan

* क्रियाविशेषण अव्यय :- 
                                    क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जे शब्द अविकारी राहतात. त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदा. दररोज , जलद, सर्वत्र इत्यादी
            ( लिंग, वचन, विभक्ती यांमुळे ज्या शब्दाच्या रुपात काहीच बदल होत नाही. अशा शब्दांना अविकारी शब्द म्हणतात.)

1. तो दररोज व्यायाम करतो 
2. ती दररोज व्यायाम करते 

            वरील दोन्ही वाक्यात लिंग बदलले आहे परंतु दररोज या शब्दामध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे दररोज हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे.
 

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

Q1. क्षणात तो निघून गेला.





Q2. सूर्यास्त झाला आहे आता हळू हळू अंधार पडेल.





Q3. चोहीकडे धुके पडले आहे.





Q4. तो आई दिसताच तुरुतुरु धावत आला.





Q5. परवा मी पुण्याला माझ्या मामाकडे गेलो होतो.





Q6. पलीकडे शाळेचा वर्ग आहे.




Q7. वैभव पटकन घरी गेला.





Q8. आज शाळेला सुट्टी आहे.





Q9. तो शामरावांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला.





Q10. पावसाचे थेंब टपटप गळू लागले





Q11. प्रवासात रात्रीच्या वेळी माझे डोळे आपोआप मिटू लागतात.





Q12. कोंबडीने आपले पंख सावकाश फडफडवले.




Q13. चोर हळुवार पावलांनी घरात शिरला.





Q14. तो काल क्रिकेट खेळायला आला नाही.





Q15. ती कविता मी चारदा वाचली.





Post a Comment

8 Comments