मराठी व्याकरण शब्दयोगी अव्यय | Marathi Grammar Verbal adjectives

मराठी व्याकरण शब्दयोगी अव्यय | Marathi Grammar Verbal adjectives
शब्दयोगी अव्यय

 * शब्दयोगी अव्यय :-

                                शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. (लिंग, वचन, विभक्ती यांमुळे शब्दाच्या रुपात काहीच बदल होत नाही अशा शब्दांना अविकारी शब्द म्हणतात.)

        उदा. १) माझ्या घरापुढे झाड आहे.

    वरील वाक्यात पुढे हा शब्द घर या शब्दाला जोडून आला आहे. त्यामुळे तो शब्दयोगी अव्यय आहे.

        उदा. २) माझे घर पुढे आहे.

    वरील वाक्यात पुढे हा शब्द घर या शब्दाला जोडून आलेला नाही व तो क्रियापदाविषयी माहिती विशेष माहिती देत आहे तर या वाक्यात पुढे हा शब्द शब्दयोगी अव्यय नसून क्रियाविशेषण अव्यय आहे. हे लक्षात घ्यावे.

* सराव :-

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा व त्यावर क्लिक करा.

Q1. घरावर कुंडी ठेवली आहे.





Q2. आपल्याला सूर्यापासून उष्णता व प्रकाश मिळतो.





Q3. अंघोळ करताना डोक्यावरून पाणी घ्यावे.





Q4. तो वेशीपाशी येऊन थांबला आहे.





Q5. मी रात्री दहापूर्वी झोपतो.





Q6. मी मधल्या सुट्टीनंतर घरी जाणार आहे.




Q7. रस्त्यावरील डांबर निघाला आहे.





Q8. शिक्षणाशिवाय जीवनाला काही अर्थ नाही.





Q9. माझ्यासोबत प्रविण गावाला येणार आहे.





Q10. वर्गाबाहेर काही मुले दंगा करत होती.





Post a Comment

11 Comments