* वचन म्हणजे काय ?
- ज्या शब्दावरून आपणास वस्तू एक आहे की अनेक (ज्यादा) आहेत हे समजते त्यास वचन असे म्हणतात.
उदा . एक वही , अनेक वह्या , एक मुलगा, अनेक मुलगे इत्यादी
* मराठी भाषेत दोन वचने मानतात.
1. एकवचन 2. अनेक वचन
* एकवचन म्हणजे काय ?
- जेव्हा एखाद्या नामाच्या रूपावरून एकाच वस्तूचा बोध होतो , तेव्हा ते नाम एकवचनी असते.
उदा . गाय, गाव , खिसा इत्यादी
* अनेकवचन म्हणजे काय ?
- जेव्हा एखाद्या नामाच्या रूपावरून एका पेक्षा जास्त (अनेक ) वस्तूंचा बोध होतो, तेव्हा ते नाम अनेकवचनी असते.
उदा . घोडे, डोळे, दागिने इत्यादी
* काही नामांची रूपे हि एकवचनात व अनेकवचनात सारखीच असतात. अशी नामे लक्षात ठेवावीत.
उदा . शाळा, देश , भाषा इत्यादी
* आदरार्थी बहुवचन म्हणजे काय ?
- आपल्यापेक्षा वयाने मोठ्या किंवा आदरणीय व्यक्तींसाठी अनेकवचनी रूपे वापरली जातात. अशा वचनांना आदरार्थी बहुवचन म्हणतात.
उदा. ते , त्यांना इत्यादी
5 Comments
Radhika Chandrakant Dolas
ReplyDeleteYash Appaso Limbikai
ReplyDeleteYash Appaso Limbikai
ReplyDeleteYash Appaso Limbikai
ReplyDeleteSarthak kalantre
ReplyDelete