Ticker

6/recent/ticker-posts

वाक्य व वाक्यांचे प्रकार भाग 1 (मराठी व्याकरण) | Marathi Grammar Types of Sentences

वाक्य व वाक्यांचे प्रकार भाग 1

 * वाक्य म्हणजे काय ?

    - अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात किंवा शब्दांची रचना करून अर्थपूर्ण शब्दसमूह तयार होतो त्यास वाक्य असे म्हणतात.

* वाक्याच्या अर्थानुसार वाक्याचे प्रमुख चार प्रकार पडतात.

1. विधानार्थी वाक्य ;-

    विधानार्थी वाक्य म्हणजे काय ?

    ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

    उदा. 1. मी दररोज व्यायाम करतो.  2. मी नियमित शाळेत जातो.

2. प्रश्नार्थी वाक्य :-

    प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय ?

    - ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो अशा वाक्यांना प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.

    उदा . 1. तुझ्या गावाचे नाव काय ?  2. तू शाळेत कधी जाणार आहेस.

3. उदगारार्थी वाक्य :-

    उदगारार्थी वाक्य म्हणजे काय ?

 - ज्या वाक्यातून भीती, आनंद अशा भावना व्यक्त केल्या जातात अशा वाक्यांना उदगारार्थी वाक्य असे म्हणतात.

    उदा . व्वा ! छान अक्षर आहे तुझे.

            बापरे ! किती मोठा साप आहे.

4. आज्ञार्थी वाक्य :-

    आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय ?

    - ज्या वाक्यातून आज्ञा किंवा आदेश दिला जातो अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

    उदा. हा पेन समीरला दे. 

            रोज व्यायाम करा.


खालील वाक्यांचा प्रकार ओळखून योग्य पर्यायावर क्लिक करा.

Q1.सर्व मुलांनी रांगेत उभा रहा.

Q2. अगाई! हात भाजला माझा.

Q3. मुलगा झाडाखाली बसून अभ्यास करत आहे.

Q4. उद्या शाळेत येताना डबा घेऊन येशील का ?

Q5. उद्या शाळेत येताना डबा घेऊन ये.

Q6. तुला सर्वात जास्त कोणता प्राणी आवडतो?

Q7. रमेश सकाळी लवकर उठतो.

Q8. सुरेश रात्री उशिरा घरी आला.

Q9. खालील वाक्याचे विधानार्थी वाक्य तयार करा.

झाडाला फुले आली आहेत का?

Q10. बगळ्याचा रंग पांढरा असतो.

Your Score:

Post a Comment

5 Comments