Marathi vyakran
लिंग व लिंगबदल

* लिंग म्हणजे काय ?

        नामाच्या रूपावरून एखादी वस्तू परुष जातीची आहे, की स्त्री जातीची आहे, किंवा नपुंसक जातीची आहे हे कळते , त्याला लिंग असे म्हणतात.

        उदा. ऊस हे एक पिक आहे. 

    वरील वाक्यात ऊस हा शब्द आलेला आहे. ऊस हा शब्द पुरुष जातीचा आहे

* मराठी भाषेत प्रामुख्याने तीन 'लिंगे' मानली जातात.

1) पुल्लिंग   2) स्त्रीलिंग    3) नपुसंकलिंग

1) पुल्लिंग :- नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुष किंवा नर जातीची आहे असा बोध होतो, तेव्हा तो शब्द पुल्लिंगी आहे असे समजले जाते. उदा. मुलगा, उंट, घोडा इत्यादी

2) स्त्रीलिंग :- नामाच्या रूपावरून एखादी वस्तू स्त्री  किंवा मादी जातीची आहे असा बोध होतो, तेव्हा तो शब्द स्त्रीलिंग आहे असे समजले जाते. उदा. मुलगी, कविता, घोडी इत्यादी

3) नपुंसकलिंग :- नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुष, स्त्री यापैकी कोणत्याच जातीची नाही असा बोध होतो, तेव्हा तो शब्द नपुंसकलिंग आहे असे समजले जाते. उदा. आकाश, ऊन, घर इत्यादी

* लिंग बदल म्हणजे काय?

    पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी नामात रुपांतर करणे किंवा स्त्रीलिंगी नामाचे पुल्लिंगी नामात रुपांतर करणे याला लिंग बदल असे म्हणतात.

        उदा. वाघ - वाघीण , भाऊ - बहिण, आई - वडील इत्यादी.

Q1. खालील नामांचे लिंग ओळखा.

किरण -

Q2. खालील नामांचे लिंग ओळखा.

दरी -

Q3. खालील नामांचे लिंग ओळखा.

ताटवा -

Q4. खालील नामांचे लिंग ओळखा.

रेषा -

Q5. खालील नामाचे लिंग ओळखा.

पाखरू -

Q6. खालील वाक्यात योग्य नामाचा वापर करा.

....... खूप अभ्यास करून वर्गात पहिली आली.

Q7.खालील वाक्यात योग्य नामाचा वापर करा.

.........ला हिरवे गवत आवडते त्यामुळे तो पोट पूर्ण भरे पर्यंत खातो.

Q8. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

त्या झाडाला खूप गोड आंबे येतात.

Q9.खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

मुंबई शहर महाराष्ट्राची राजधानी आहे.

Q10. खालील वाक्यात योग्य नामाचा वापर करा.

......... खूप चांगला क्रिकेट खेळतो.

Q11. खालील नामाचे लिंग ओळखा.

लेकरू -

Q12. खालील नामाचे लिंग ओळखा.

बाळ -

Q13.खालील नामाचे लिंग ओळखा.

गाढव -

Q14. खालील नामाचे लिंग ओळखा.

स्वर -

Q15.खालील नामाचे लिंग ओळखा.

भाकरी -

Your Score: