
मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यय प्रकार
1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय:- ज्या क्रियाविशेषणातून काळ दर्शविला जातो. त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदा. परवा मी गावाला गेलो होतो.
वरील वाक्यात परवा हा शब्द काळ दर्शवितो म्हणून तो कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे.
2) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय:- ज्या क्रियाविशेषणातून ठिकाण (स्थळ) दर्शविले जाते. त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदा. पलीकडे शाळा आहे.
वरील वाक्यात पलीकडे हा शब्द स्थळ, ठिकाण दर्शवितो म्हणून तो स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे.
3) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय:- ज्या क्रियाविशेषणातून संख्या दर्शविली जाते. त्याला संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदा. बागेत पुष्कळ फुले आहेत.
वरील वाक्यात पुष्कळ हा शब्द संख्या किंवा प्रमाण दर्शवितो म्हणून तो संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे.
4) रीतिवाचक संख्याविशेषण अव्यय:- ज्या क्रियाविशेषणातून रीत दर्शविली जाते. त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदा. तो पटकन घरी आला.
वरील वाक्यात पटकन हा शब्द येण्याची रीत दर्शवितो म्हणून त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
10 Comments
Mokashe Madhav
ReplyDeleteछान
ReplyDeleteखूप छान आणखी पाठवा
ReplyDeleteनक्कीच
DeleteYash Appaso Limbikai
ReplyDeleteYash Appaso Limbikai
ReplyDeleteYash Appaso Limbikai
ReplyDeleteAarti babaso nagaroje
ReplyDeleteAarti babaso nagaroje
ReplyDeleteSarthak kalantre
ReplyDelete