Ticker

6/recent/ticker-posts

मराठी व्याकरण केवलप्रयोगी अव्यय | Marathi Grammar Exclamatory adjectives

मराठी व्याकरण केवलप्रयोगी अव्यय



 * केवलप्रयोगी अव्यय:-

                                उत्स्फूर्तपणे भावना प्रकट करणाऱ्या उदगारवाचक अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय म्हणतात. (लिंग, वचन, विभक्ती यांमुळे शब्दाच्या रुपात काहीच बदल होत नाही अशा शब्दांना अविकारी शब्द म्हणतात.) 

            मनातील एकाकीपणा, आश्चर्य, आनंद, भीती, दुःख, तिरस्कार इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी केवलप्रयोगी शब्दांचा उपयोग केला जातो. ( केवल म्हणजे फक्त; प्रयोग म्हणजे वापर.)

        उदा . अबब ! केवढा मोठा साप.

        वरील वाक्यात मनातील आश्चर्य व्यक्त करण्यासाठी अबब या शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे अबब हा शब्द केवलप्रयोगी अव्यय आहे.

Q1. शाब्बास ! खूप छान गुण मिळालेत.

Q2. अरेरे! धावताना पडला तो.

Q3. अहाहा! काय सुंदर फुल आहे.

Q4. व्वा! छान हस्ताक्षर आहे.

Q5. अगाई! हात मोडला माझा.

Q6. हॅट्! हे असलं काम मला सांगू नकोस.

Q7. शीS! किती घाणेरडा आहेस तू!

Q8. 'बापरे!' या उदगारातून काय व्यक्त होते?

Q9. 'अरेरे!' या शब्दातून कोणती भावना योग्य करता येते?

Q10. 'अहाहा!' या वाक्यातून कोणती भावना व्यक्त होते?

Q11. केवलप्रयोगी अव्ययाच्या पुढे नेहमी खालीलपैकी कोणते चिन्ह देतात?

Your Score:

Post a Comment

7 Comments